ब्रेकींग : काँग्रेसच्या मोची समाजातील 28 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे ; शहर मध्य मधून उमेदवारी द्या अन्यथा….
सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातील मोची समाजाला उमेदवारी द्यावी या मागणीने आता जोर भरला आहे. मोची समाजाचे नेते आक्रमक झाले असून काँग्रेस पक्षातील मोची समाजाच्या तब्बल 29 पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.
मोची समाजातील संजय हेमगड्डी, देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे, नरसिंह आसादे, बसवराज म्हेत्रे, हनुमंत सायबोळू समाजातील या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ समाज हा काँग्रेसच्या पाठीशी कायम राहणारा जवळपास मोची समाजाचे लोकसंख्या सोलापूर शहरात व जिल्ह्यात एक लाखाहून अधिक आहे. शहर मध्य हा मतदार संघ काँग्रेस पक्षाचे बाले किल्ले असून सदर मतदार संघामध्ये मोची समाजाचे एकूण मतदार ५०००० हजारहून अधिक आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये काही मोची समाजाच्या पक्षाकडून मागणी असतांना आपण काँग्रेस पक्षाने मोची समाजाला शब्द दिला होता. असे असतांना यंदा समाजाच्या वतीने माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणी केले असतांना आजतागायत पक्षाने कोणताही विचार न करता, जर मोची समाजाचे उमेदवार घोषणा नाही केल्यास मोची समाजाचे सर्व काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देण्यात येईल याची नोंद घ्यावी.
शहर मध्य मध्ये सन २०१४ व २०१९ साली मा. खासदार प्रणिती शिंदे यांना आमदार करण्यात आमचा सिंहाचा वाटा होता. त्याचा देखील विचार करुन मोची समाजाला यंदाही वेळी उमेदवार काँग्रेस पक्षाकडूनच घोषीत करावी अशी मागणी केली.