Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! मतमोजणी केंद्रात फक्त यांनाच मोबाईल परवानगी ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2024
in Election
0
ब्रेकींग ! मतमोजणी केंद्रात फक्त यांनाच मोबाईल परवानगी ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकींग ! मतमोजणी केंद्रात फक्त यांनाच मोबाईल परवानगी ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

सोलापूर, दिनांक 29(जिमाका)-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 42- सोलापूर(अ. जा.) व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती. त्याच अनुषंगाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 04 जून 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्याने यासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी व मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांनी ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणीच्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी व मतमोजणी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, मतमोजणी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. ज्याप्रमाणे मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली त्याप्रमाणेच सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन पार पाडावी. मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी कक्षात प्रवेश करण्यासाठी पासेस बनवून घ्यावेत. विना पास कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाकडील अधिकृत पासेस असलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षा पर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच माध्यम कक्षा पर्यंत मोबाईल घेऊन जाणे व वापरणे यासाठी परवानगी असेल असेही त्यांनी सांगितले.

मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. मतमोजणीचे पर्यवेक्षण व नियंत्रण टीम, भोजन व्यवस्था, मतमोजणी कक्ष व परिसरातील स्वच्छता, मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांना जागेवर जेवण्याची व्यवस्था यासाठी नियुक्ती केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी चार जून रोगीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने रामवाडी येथील शासकीय गोडाऊनमध्ये निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकारी व अन्य अधिकारी कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात आलेला जबाबदारीची माहिती सविस्तरपणे सांगून ती जबाबदारी सर्व संबंधितांनी यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले. मतमोजणी कक्षात दोन्ही मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येक मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रत्येकी दोन असे एकूण चार निवडणूक निरीक्षक यांनाच मोबाईल वापरण्याची परवानगी असणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
*********

Tags: Collector kumar ashirwadLoksabha election 2024Solapur loksabha electionVote counting
SendShareTweetSend
Previous Post

सुरत चेन्नई एक्सप्रेसच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना 15 जूनपर्यंत…..

Next Post

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक रुपया ही घेतला नाही ; आडम मास्तर यांचे विधानसभेबाबत मोठं वक्तव्य

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971192
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group