ब्रेकिंग : मराठा समाजाच्या बैठकीत एकाला बडवले ! यांचा केला एकेरी उल्लेख, समर्थक चिडले
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक नंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली होती. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.
यामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूरहुन आलेल्या ऍड. रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख केला.
यावेळी ऍड. रोहित फावडे याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले? असा आरोप केला.
याच ऐकरी उल्लेख आणि आरोपनंतर जन्मजेयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले.
आक्रमक समर्थक ऍड. रोहित फावडे याच्या अंगावर धावून गेले, प्रचंड मारहाण या तरुणाला करण्यात आली.
यावेळी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला आणि बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काहीच वेळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले, ऍड. रोहित फावडे याला पोलिसांनी आधी बाहेर काढलं त्यानंतर जन्मजेयराजे भोसले आणि त्याचे समर्थक बैठकीच्या ठिकाणाहून निघून गेले. पोलिसांच्या सुरक्षेमध्ये मराठा समाजाची बैठक पुन्हा एकदा सुरु झाली.