सोलापूर : शाळेला गेलेल्या इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या बालकाचे अपहरण झाल्याची घटना गुरुवारी घडली. पृथ्वीराज सुरेश बिराजदार राहणार धोत्री तालुका दक्षिण सोलापूर असे त्या अपहरण झालेल्या विद्यार्थी मुलाचे नाव आहे.
पृथ्वीराज बिराजदार हा धोत्री गावात आपल्या मावशीकडे मागील वर्षभरापासून राहत होता. सोलापूर शहरातील भवानी पेठेतील सिद्धेश्वर इंग्लिश मेडियम स्कुल दुसरी मध्ये शिकतो. धोत्री गावातून रोज सकाळी साडेसहा वाजता बस मध्ये बसून सोलापुरात शाळेला जाऊन परत दुपारी अडीचच्या सुमारास तो बस मध्ये गावात येत होता.
गुरुवार 30 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता शाळेला गेला मात्र दुपारी घरी आलाच नाही, स्कूल बस चालकाने फोन करून मुलगा सकाळी शाळेला आला नाही किंवा दुपारीही दिसला नाही असे सांगितले. त्यानंतर मुलाच्या काकाने शाळेमध्ये फोन लावला मात्र शाळेतील शिक्षिकेने आज शाळेला पृथ्वीराज आला नाही अशी माहिती दिली, वर्गातील मुलांकडेही चौकशी केली असता त्याचा शोध लागला नाही.
त्यावेळी गावात व आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र त्या मुलाचा शोध घेतला असता तो सापडला नाही शेवटी वळसंग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगावर निळा कलर शर्ट, दुधी कलर जिन्स पॅन्ट व अंगावर चाँकलेटी जाँकेट व पाठीला शाळेचा बँग असे वर्णन आहे

















