“माढा तालुक्यातील बावी गावातील हे शेतकरी रहिवासी आहेत त्यांना दादा पाटील या नावाने ओळखले जाते त्यांनी टेंभुर्णी जवळील अकोले बुद्रुक या गावांमध्ये शेतजमीन घेतली आहे त्या जमिनीवर पारधी समाजाच्या काही लोकांनी कब्जा केला होता त्यासाठी सुरेश पाटील यांचे जिल्हा प्रशासन दरबारी हेलपाटे सुरू होते अशी माहिती समोर आली आहे दरम्यान जिल्हाधिकार्यांनी ताबडतोब बेशुद्धावस्थेतील सुरेश पाटील यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले तातडीने त्यांना आयसीयूमध्ये ठेवून उपचार सुरू करण्यात आले असून डॉक्टर धडके यांच्या नियंत्रणाखाली 24 तास उपचारासाठीठेवण्यात आले असल्याचे सिव्हील हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितले”.
सोलापूर : माढा तालुक्यातील टेंभुर्णी इथल्या एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही घटना सोमवारी दुपारी अडीच ते तीन च्या दरम्यान घडली.
सुरेश पाटील असे त्या रोगर नावाचे विषारी औषध पिलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी सुरेश पाटील हे सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटण्यास आले होते.
िल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर येऊन त्याने विषारी औषध प्राशन केले तसेच तो खाली आला मात्र प्रमुख प्रवेशद्वारासमोरच त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला, हे चित्र पाहून जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई जिल्हाधिकाऱ्यांचे बॉडीगार्ड यांनी ॲम्बुलन्सला फोन लावला. मात्र अँबुलस वेळेवर न आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या गाडीत घालून त्या शेतकऱ्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नक्की त्याने विषारी औषध कशासाठी प्राशन केले याची अद्याप ही सविस्तर माहिती मिळू शकली नाही मात्र त्याच्या शेतावर कुणीतरी कब्जा केल्याने वैतागलेल्या या शेतकऱ्याने असे कृत्य केल्याची माहिती सध्या समोर येत आहे.


















