सोलापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअर कमिटी महापालिका निवडणूक समन्वयक शेखर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली आहे.
सोलापुरात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने गुरुवारी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक शहर अध्यक्ष, कार्याध्यक्ष, आजी माजी ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकी संदर्भात निर्णय घेणे कामे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने कोअर कमिटी स्थापन करण्यात आली असून सदर कमिटी आज राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव तथा सोलापूर मनपा निवडणूक समन्वयक शेखर माने यांचे कडून जाहीर करण्यात आली.
या बैठकीस शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर तथा नगरसेवक महेश कोठे, गटनेते किसन जाधव, ज्येष्ठ नेते माजी महापौर मनोहर सपाटे, प्रदेश सचिव शंकर पाटील, महिला शहराध्यक्ष तथा नगरसेविका सुनिता रोटे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, नगरसेवक तौफिक शेख, आनंद चंदनशिवे, जुबेर बागवान, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. या कोअर कमिटीमध्ये अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश न केलेले तोफिक शेख यांची मात्र इंट्री झाली आहे परंतु पालकमंत्री भरणेमामा यांचे लाडके नगरसेवक आनंद चंदनशिवे हे कुठेही दिसत नाहीत.
■ सोमपा निवडणुकीसाठी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटी मधील सदस्य यादी खालीलप्रमाणे -👇👇👇















