सोलापूर : दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज माघार घेण्याचा 15 फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची बैठक शनिवारी शासकीय विश्रामगृहावर दुपारच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती.
सुमारे पाच तासाच्या बंद खोलीतील चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना दिलीप सोपल यांनी माहिती दिली. सर्व नेत्यांची एकत्रित चर्चा केली, इच्छुक उमेदवारांची चर्चा केली, त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील नेत्यांशी वैयक्तिक चर्चा केली. दूध संघ बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांच्याशीही चर्चा केली. ही निवडणूक बिनविरोध कशी होते यासाठी आमचा प्रयत्न आहे. सर्व नेत्यांमध्ये समन्वय आणि एकमत झाले आहे, अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, अर्ज माघार घेण्यासाठी अजून दोन दिवस असून या दोन दिवसात आणखी बैठका-चर्चा होतील. पुन्हा बचाव समितीला चर्चेसाठी बोलावण्यात येईल आणि त्यानंतरच निर्णय घेऊ असे सोपल म्हणाले….
दूध संघ बचाव समितीने सुरुवातीला चर्चा केली नाही, सुरुवातीला बोलले असते तर चर्चेला तोंड फुटले असते आणि प्रसंग टळले असते,परन्तु पाहू अजून दोन दिवस आहेत 👇👇👇👇















