भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचे प्रत्युत्तर ; चेतन नरोटे यांनी देवेंद्र कोठे यांचे सगळेच काढले !
सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथे आमदार देवेंद्र कोठे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देत त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले.
या वेळी ‘या देवेंद्र कोठेचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय’, ‘जावई-सासूचे आंदोलन हाय हाय’, ‘अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या मोदींचा निषेध असो’, ‘पाकिस्तानी बिर्याणी खाणाऱ्या मोदींचा निषेध असो’, ‘शहीदांच्या चितेवर राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजपचा धिक्कार असो’, देश के गद्दारोंको जुते मारो सालों को अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून गेला.
यावेळी अध्यक्ष चेतन नरोटे,अशोक निम्बर्गी, गणेश डोंगरे, मनोज यलगुलवार, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, नागनाथ कदम यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली.
अध्यक्ष नरोटे म्हणाले की, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत जे भाषण केले, त्यात कुठेही सैन्याचा अपमान केलेला नाही. उलट सैनिकांचा सन्मान आणि अभिमान व्यक्त केला आहे. पहलगाम हल्ल्यातील आरोपी आजपर्यंत का पकडले नाहीत? डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्यावर सीजफायर का केले? किती फायटर विमाने पाडली, त्यातील जवानांचे काय झाले? भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या विषयात अमेरिकेचा हस्तक्षेप का? पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न मोदी सरकारला त्यांनी विचारले होते.
चायना घुसखोरी करत आहे, बांगलादेशातून नागरिकांची घुसखोरी सुरू आहे, पाकिस्तान वारंवार हल्ले करत आहे. या विषयावर पंतप्रधानांनी संसदेत खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देणे गरजेचे होते. मात्र ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत. ऑपरेशन सिंदूर हा सरकारचा फार्स होता, असे खासदार शिंदे यांनी म्हटले. त्यांच्या भाषणाचे देशभर कौतुक होत असताना त्याचा विपर्यास करून बालिश आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेले आंदोलन हा गाढवपणा असल्याचे नरोटे यांनी सांगितले.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ देवेंद्र कोठे यांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस भवन समोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार देवेंद्र कोठेच्या प्रतिमेला जोडेमार करत ‘जशास तसे’ उत्तर दिले. पुढे बोलताना नरोटे म्हणाले, ‘प्रणितीताईंचे भाषण समजले नसेल तर आमच्याकडे या, आम्ही नीट ऐकवू. हे भाजपचे आंदोलन नाही, यात भाजपचा एकही आमदार, नगरसेवक किंवा पदाधिकारी नव्हता. हे जावई-सासूचेच आंदोलन आहे. कोठे परिवाराची ओळख शिंदे परिवारामुळेच आहे. शिंदे कुटुंबाविरोधात विष ओकणे थांबवा. आज फोटोला चपलेने मारले, उद्या खरेच मारले जाईल, हे लक्षात ठेवा.’
या आंदोलनात माजी महापौर सुशीलाताई आबुटे, प्रदेश सचिव प्रा. नरसिंह असादे, राहुल वर्धा, नगरसेवक प्रवीण निकाळजे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, सुशील बंदपट्टे, प्रवक्ते अशोक निम्बर्गी, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, अब्दुल खलीक मुल्ला, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, शिक्षक सेल अध्यक्ष सुबोध सुतकर, मागासवर्गीय सेल अध्यक्ष उमेश सुरते, प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम, उत्तर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, शफी हुंडेकरी, अॅड. करीमुनिसा बागवान, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, शोभा बोबे, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, गिरिधर थोरात, दिनेश म्हेत्रे, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, कोमारो सय्यद, भीमराव शिंदे, संध्या काळे, शुभांगी लिंगराज, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, सागर उबाळे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, श्रीशैल रणधीरे, हरुण शेख, प्रवीण जाधव, राजेश झंपले, रमेश जाधव, सुशीलकुमार म्हेत्रे, विवेक इंगळे, एजाज बागवान, गंगाधर शिंदे, रवी आंबेवाले, शिवाजी सांळुखे, व्यंकटेश बोमेन, निशा मरोड, सलीमा शेख, चंद्रकला शिंदे, इंदुमती शिंदे, रत्नमाला ढोबळे, मेघा बनसोडे, चंद्रकांत टिक्के, मल्लेश सूर्यवंशी, गंगाधर शिंदे, प्रा. अनिल वाघमारे, मोहसिन फुलारी, संजय कुराडे, राज शिंदे, अकबर शेख, समीर बिजापुरे, श्रीनिवास परकीपंडला, जब्बार शेख, प्रसन्ना आरके, जीतराज गरड, सुरेश शिवरथ, आप्पा सलगर, आबा मेटकरी, संभा खांडेकर, मौलाली शेख, चंदू नाईक, आनंद समारंभ, साई शिंदे, अभिलाष अच्युगटला, युसुफ मुलानी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.