भाजपने कुरघोड्या थांबबाव्या अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील ; ‘मध्य ‘वरून शिवसेना नेते एकवटले !
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता उमेदवारांची यादी जाहीर होत आहे सोलापुरातील शहर मध्ये हा विधानसभा मतदारसंघ महायुती मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार ही आता जवळजवळ निश्चित झाले आहे.
या मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, हे प्रमुख इच्छुक आहेत प्रत्येकाने आपापल्या परीने या मतदारसंघात बरीच विकास कामे केली आहेत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत आणि मोर्चे बांधणी सुद्धा केली आहे असे असताना अचानक कॉन्ट्रॅक्टर प्रमोद मोरे यांचे नाव अचानक समोर आले त्यांच्या नावाची या मतदारसंघात जोरदार चर्चा होऊ लागली आणि त्यांना उमेदवारी निश्चित झाल्याचेही बोलले जाऊ लागले.
पण हा मतदारसंघ निष्ठावंत शिवसैनिकांचा असून इथे परका आम्ही खपवून घेणार नाही, या ठिकाणी आम्हा पैकी कुणालाही उमेदवारी द्यावी, सर्व एकत्र येऊन काम करू अशा भावनेतून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शहर प्रमुख मनोज शेजवाळ, प्राध्यापिका ज्योती वाघमारे, संघटक उमेश गायकवाड हे नेते एकवटले. या सर्वांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनीष काळजे म्हणाले, शहर मध्य ही जागा पारंपारिक शिवसेनेची आहे तिथे शिवसेनेचा मंत्री झाला आहे. दक्षिण सोलापूर हा मतदार संघ सुद्धा शिवसेनेकडे होता परंतु मित्र पक्ष म्हणून 2014 ला तो भाजपला देण्यात आला. शहर मध्ये हा शिवसेनाच लढणार आणि शिवसेनाच उमेदवार देणार असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असून तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.
पण याठिकाणी भाजप जर कुरघोड्या करीत असेल तर त्याचे सगळीकडे परिणाम त्यांना भोगावे लागतील तशी त्यांनी तयारी ठेवावी असा इशारा दिला.
शहर प्रमुख मनोज शेजवाळ म्हणाले, शहर मध्य ही जागा पारंपारिक शिवसेनेची आहे, अगोदर ही आम्हीच लढत होतो, आम्ही सर्व पदाधिकारी मिळून ही जागा निवडून आणू, ही माहिती आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांना दिली. त्यांनी सांगितले हा मतदारसंघ आपलाच आहे त्यामुळे निश्चित रहा, आणि आपला आमदार करा.