कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप
आज भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक पिंपरी चिंचवड येथे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा मंडल निहाय आढावा घेतला व स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी तयार राहण्याचे सूचना जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष यांना दिल्या.
या बैठकीत मध्य पूर्व मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मंडलातील केलेल्या संघटनात्मक कार्याचा अहवाल रवींद्र चव्हाण यांना सादर केला. याप्रसंगी रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या कार्याचा अहवाल पाहून अंजिखाने यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत, पार्टीला अपेक्षित काम आपल्याकडून होत असून आपण असेच कार्य करत रहा मी आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी मध्य मधील मंडल अध्यक्ष नागेश खरात व नागेश सरगम यांनी देखील त्यांचा अहवाल सादर केला.