ताफा थांबवला,जखमी आजोबांना तातडीची केली मदत,फोटो घेणं ही टाळलं ! देवाभाऊ झाले हळवे!
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे संवेदनशील नेते म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीच्या हंगामात त्यांनी प्रचार सभांचा जोरदार तडाखा लावला आहे. याच घाई गडबडीत त्यांनी एका जखमी आजोबाची केलेली मदत चर्चेत आहे. नागपुरच्या टेकडी मंदिराजवळ ते एक ६५ वर्षीय व्यक्ती जखमी अवस्थेत पडला होता. फडणवीसांचा ताफा त्या रस्त्यावरुन जात होता. फडणवीसांची नजर त्यांच्यावर पडली. यानंतर फडणवीसांनी आपली संवेदनशीलता दाखवत त्यांच्या उपचाराची सोय लावून दिली.
घडलं असं की, रामनवमी उत्सवात सामील होण्यासाठी फडणवीस निघाले होते. नागपूरातील ठिकठिकाणी ते भेटी देत होते. अशात टेकडी मंदिर जवळ एक आजोबा रस्त्याच्या कडेला पडल्याचं फडणवीसांनी स्वतः पाहिलं. त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला. सदरील व्यक्तीची अवस्था गंभीर होती. अंगभर रक्त होतं. त्याला उलट्या होत होत्या. अशात फडणवीसांनी तातडीने अॅम्ब्युलेन्स बोलावली. जखमीला रुग्णालयात पाठवूनच ते पुढे निघाले.
फडणवीसांनी मुख्यमंत्री पदावर असताना ‘मुख्यमंत्री सहायत्ता निधी’ची तरतुद केली होती. यातून अप्रत्यक्षपणे हजारो रुग्णांना त्याचा फायदा झाला होता. राज्य शासनाच्या या निर्णयाचं मोठं कौतूक ही झालं होतं. आता ही फडणवीस पुन्हा संवेदनशीलता जपताना दिसले. त्यांनी जखमीची मदत केली. हे करताना त्यांनी फोटो आणि व्हिडीओ घेणं ही टाळलं. त्यांच्या रुपात राजकीय नेते राजकीय धामधुमितही कशी माणूसकी जपतात हे दिसून आलंय.