अनंत जाधव यांचा भाजप उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा ; ज्या दिवशी निवड त्या दिवशी राजीनामा
सोलापूर : सोलापुरातील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा नूतन शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या दिवशी निवड जाहीर झाली त्याच दिवशी राजीनामा दिल्याने गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सोशल मीडियावर…
नमस्कार
या पत्राद्वारे
मी माझ्या व्यक्तिगत कारणास्तव नव्याने जाहीर झालेल्या शहर जिल्हा कार्यकारणी मधील शहर उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे .
माननीय आमदार श्री विजयकुमार देशमुख यांचे नेतृत्वात मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कायम कार्यरत राहील .
धन्यवाद 🙏
अशी पोस्ट व्हायरल केली आहे.
सध्या सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड गटबाजी पाहायला मिळते. एकीकडे दोन देशमुख आमदार यांचा स्वतंत्र गट आणि दुसरीकडे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे आणि यांच्या दोघांसोबत खंबीर असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा गट पाहायला मिळतो.
यातूनच शहराध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेत्या रोहिणी तडवळकर यांची निवड झाली. त्यानंतर तडवळकर यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केले. त्यामध्ये अनंत जाधव यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. पण त्यांनी तातडीने आपला पदाचा राजीनामा दिला आहे.
याप्रकरणी त्यांच्याशी संपर्क साधला असता आपण किती वेळा उपाध्यक्ष पदावर काम करणार, इतर कार्यकर्त्याला सुद्धा या पदावर संधी दिली पाहिजे, आमच्या मतदार संघाचे आमदार विजयकुमार देशमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले.