भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी उभारली गुढी
गुढीपाडवा अर्थात चैत्री पाडवा म्हणजे मुहूर्त शास्त्रामध्ये जे साडेतीन शुभ मुहूर्त सांगितले आहेत, त्यापैकी एक मुहूर्तदिन. अशा या शुभ मुहूर्तावर सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती भाजी मार्केट येथे काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते गुढी उभारून मनोभावे पूजा केली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या जीवनात या नववर्षात सुख, शांती व समृद्धी लाभावी, यासाठी प्रार्थना केली. तसेच सर्व बंधू-भगिनींना हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी संदीप महाले, सूरज पाटील, उदय चाकोते, संजय होमकर, भरती ईप्पलपल्ली, अक्षय वाकसे, विजय साळुंखे, सिद्धाराम चाकोते, विवेक कन्ना, चंद्रकांत टिक्के, संताजी भोळे, मल्लिनाथ सोलापूरे, रवी गड्डम, दीपक दुधाळे, शिवाजी खटके, लींगराज ताटीकोंडा, नुर अहमद नालवर, गणेश गड्डम यांच्यासह त्या भागातील नागरिक, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.