सोलापुरात भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक ; राहुल गांधी यांचा गाढव गांधी म्हणून उल्लेख
सोलापूर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्यं केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर च्या वतीने दत्तनगर या ठिकाणी जोडेमार आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमा फाडण्यात आल्या.
काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ओबीसी समाज यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य केले या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये निषेध नोंदवण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने सोलापूर शहर भाजप पक्षाच्या वतीने दत्तनगर दाजी गणपती या ठिकाणी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडमार आंदोलन करण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांचे पोस्टर फाडून तो पोस्टर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असता पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पोस्टर घेण्यासाठी धक्काबुक्की झाली.
यावेळी राहुल गांधी यांचे पोस्टर फाडून टाकण्यात आले. दरम्यान या आंदोलना बाबत बोलताना जेष्ठ नेते रामचंद्र जंनू यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सडेतोड टीका केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.