भीमाशंकर म्हेत्रे आठ वर्ष कुठे होता? बाबो ! लोकं विचारू लागली
सोलापूर : महापालिकेच्या निवडणुका लागल्या की, नेते स्वतःच्या फायद्यासाठी इकडून तिकडे पळतात. त्यांना जनतेचे शहराच्या विकासाचे काही घेणे देणे नसते. कुठे adjust व्हायचे, हे आपल्या सोईनुसार ते करत असतात.
महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 21 मधून काँग्रेसला तीन वेळा पराभूत केलेले माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे हे निवडणूक लढवत आहेत. ते पण काँग्रेसच्या पॅनल मध्ये. हाच मोठा राजकारणातला जोक आहे.
2017 च्या निवडणुकीत पराभूत झाल्या नंतर म्हेत्रे हे आपल्या प्रभागात, आपल्या म्हेत्रे वस्ती, कल्लाप्पा म्हेत्रे वस्ती, म्हेत्रे नगर, हुच्चेश्वर नगर भागात किती वेळा गेले, किती लोकांची विचारपूस केली, किती लोकांच्या मदतीला ते धावून आले हा संशोधनाचा विषय आहे. मुळात त्यांनी जे चिन्ह घेतले आहे ते मुळात शहरी भागात कुणाला माहिती नाही हे पण तितकेच खरे असल्याचे लोकं सांगत आहेत.
त्यांच्यावर पूर्वी प्रेम करणारी म्हेत्रे वस्ती आज वीस वर्षापासून आहे तशीच आहे. साधा रस्ता सुद्धा तिथे झालेला नाही. त्यामुळे आज ते याभागात मत मागायला जात आहेत तिथे प्रत्येक जण असाच प्रश्न विचारतात की भीमाशंकर म्हेत्रे आठ वर्ष कुठे होता?





















