
भाऊ अन् भाईसाठी सब कुछ ; काँग्रेसच्या सुशीलकुमारने केला प्रामाणिक प्रचार
सोलापूर : यंदाची महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे चित्र दिसत आहे वर्षानुवर्ष सोलापूर महानगरपालिकेच्या सत्ता भोगलेल्या काँग्रेस पक्षाला यंदा बॅकफुटवर जावे लागले आहे 102 जागे पैकी केवळ 51 जागा काँग्रेसने लढवल्या.
या निवडणुकीत शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांचे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. आमदार देवेंद्र कोठे विरुद्ध चेतन नरोटे अशीच लढत होत असल्याचे पाहायला मिळते.
माजी महापौर आरिफ शेख हे चेतन नरोटे यांच्या पॅनल मध्ये आल्याने काँग्रेसला वातावरण चांगले तयार झाले. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधील मुस्लिम समाज, मोची समाज, धनगर समाज या तीन समाजाची मते निर्णय ठरणार आहे.
अनुसूचित जाती महिला मधून माजी परिवहन सभापती बसवराज म्हेत्रे यांच्या सुनेला सुरुवातीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती परंतु नंतर ती बदलून सपना अल्कोड यांना देण्यात आली. पक्षाची मिळालेली उमेदवारी बदलल्याने म्हेत्रे परिवार नाराज होईल अशी चर्चा होती परंतु बसवराज म्हेत्रे आणि त्यांचे चिरंजीव सुशीलकुमार म्हेत्रे यांनी प्रामाणिकपणे काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील दहा ते बारा दिवस चेतन भाऊ आणि आरिफ भाई यांच्यासोबत सुशीलकुमार हा सर्वत्र प्रचार करताना दिसून येतो. विधानसभा निवडणुकीत मोची समाज भाजपकडे वळाल्याने या समाजाला पुन्हा काँग्रेसकडे वळवण्यात सुशीलकुमार म्हेत्रे हा कितपत यशस्वी होतो हे 16 जानेवारी रोजी समजणार आहे. पण भाजपकडे जाण्यामध्ये काय अर्थ नाही, तिथे प्रचंड गर्दी झाली आहे, त्यामुळे आपले काँग्रेस बरे आहे अशी चर्चा सुशीलकुमार यांच्या समर्थकांमधून ऐकण्यास मिळाली. मात्र निवडणुकीनंतर सुशीलकुमार म्हेत्रे याला पक्षाने मोठं पद देणार असल्याचे सांगण्यात आले.






















