खासदारांच्या ‘पीए’ला वाढदिनी भावी ‘आमदारकी’च्या शुभेच्छा
सोलापूर : नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचे अनेक स्वीय सहाय्यक आहेत पण त्यामध्ये सर्वांच्या तोंडी असणारे एक नाव म्हणजे बंटी. कुमारगौरव चंदनशिवे हे नाव सोलापुरात कुण्या राजकीय कार्यकर्त्याला माहित नाही असे होणे शक्य नाही.
बंटी यांचा स्वभावच तसा आहे, प्रणिती ताईंचा पीए असून ही चेहऱ्यावर आविर्भाव दिसत नाही. प्रत्येकाशी व्यवस्थित बोलणारे मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून बंटी यांची ओळख आहे. ताईंनी कोणता विषय बंटी यांच्याकडे दिला तर कशा प्रकारे त्या व्यक्तीला मदत होईल त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच यंदाचा बंटी दादाचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
ताई खासदार झाल्याने त्या वाढदिवसाला वेगळे वलय प्राप्त झाले होते.अनेक स्तरातून त्यांना दिवसभर शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये काँग्रेसच्याच काही नेत्यांनी बंटी यांना भावी आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या हे या वाढदिवसाचे वैशिष्ट होते.
सायंकाळी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्याठिकाणी एम के फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी आवर्जून उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. आई फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश राठोड, पंचशील संस्थेचे प्रमुख श्रीशैल रणधीरे, गुरुशांत मोकाशी, किरण गायकवाड, श्रीरंग मगर, मिलिंद ठोंबरे, विकास बनसोडे, अभिजित भडकुंबे, प्रा. प्रीतम कोठारी, सुहास कदम, आनंद मुस्तारे, यांच्यासह शेकडो मित्र परिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन भीमबाबा प्रतिष्ठान व मनाचा आजोबा गणपती प्रतिष्ठानने केले.