प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांना पितृशोक
सोलापूर : कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालय लातूरचे प्राचार्य डॉ दुष्यंत कटारे यांचे वडील मनोहर दादाराव कटारे यांचे मंगळवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 78 वर्ष होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्याचा अंत्यविधी सुरतगाव तालुका तुळजापूर या राहत्या गावी त्यांचा मंगळवार दुपारी तीन वाजता होणार आहे. सिंहासन चॅनलचे संपादक प्रशांत कटारे यांचे ते चुलते होत.