सोलापुरात लोकमान्य टिळकांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न ; काँग्रेसच्या सुशील बंदपट्टे यांनी उजेडात आणला प्रकार
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन शहरातील महत्वाचा विषय उजेडात आणला आहे. महापालिकेने त्याचा पाठपुरावा न केल्यास आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला.
शहराच्या बाजारपेठेतील मुख्य चौकात (टिळक चौक) लोकमान्य टिळकांचा पुतळा बसविला आहे. सदर पुतळा हा टिळकांचा संघर्ष आणि त्यांचे कार्य तमाम जनतेला स्मरणात रहावे ह्या करीताच बसविला आहे. परंतु सध्य परिस्थितीत या पुतळ्याची दुर्दशा झाली असून पुतळ्या भोवतीचा परिसर सुद्धा खराब झालेला आहे.
आपणास माहित असेलच की, सदर पुतळा उभा करण्यासाठी जो संघर्ष झाला होता त्या संघर्षाची साक्ष देणारी कोनशिला तिथे लावण्यात आली होती. परंतु नंतर सुशोभिकरण करत असताना ती जुनी कोनशिला गायब करण्यात आली आहे. आणि त्या जागी नवीन कोनशिला बसविण्यात आली आहे.
तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानाची अवस्था देखील अतिशय बिकट झाली असून सदर उद्यानाची जबाबदारीपूर्वक सुशोभिकरण करण्यात यावे हि नम्र विनंती.
या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करीत आहोत कि तात्काळ आपण जुनी कोनशिला शोधण्याचे आदेश आपल्या कर्मचारी वर्गास देऊन सदर कोनशिला नव्याने सुशोभिकरण करून त्याजागी पुन्हा बसवावे.
कृपया याची तात्काळ दखल घेऊन यावर त्वरित कारवाई करावे अन्यथा लोकशाही पध्दतीने जुनी कोनशिला पुन्हा बसवेपर्यंत आम्ही महापालिका आणि जबाबदार कर्मचाऱ्या विरोधात आंदोलन उभे करू असा इशारा त्यांनी दिला आहे.