राष्ट्रवादीचे ‘अण्णा’ सोलापुरात तीन दिवस तळ ठोकून राहणार ; बैठका, पक्षप्रवेश, गाठीभेटी अन् बरेच काही
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण अंतिम झाल्यानंतर राजकीय घडामोडी आणि हालचालींना वेग आला आहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत राज्यातील महायुती स्वतंत्र लढण्याचे चिन्ह दिसत असल्याने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने स्वबळाची तयारी करण्यात आली आहे.
सोलापूरच्या संपर्क मंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती केली आहे. यासोबत विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे सह संपर्क मंत्रीपद देण्यात आले आहे.
अण्णा बनसोडे आता तब्बल तीन दिवस सोलापूर मध्ये तळ ठोकून राहणारा असून ते सर्व 26 प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती शहराचे अध्यक्ष संतोष पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

















