आनंद चंदनशिवे यांच्याकडून नूतन पालकमंत्र्यांचा सत्कार ; रामभाऊंनी घातली भेट
सोलापूर : महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर मागील आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मान खटाव चे विद्यमान आमदार तथा ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथेआढावा बैठक प्रसंगी उपस्थित राहिले होते.
बैठक संपवून परतीच्या प्रवासा वेळी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून भेट घडून आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांची सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे त्यांच्याशी परिचय करून दिला यावेळी त्यांचा निळी टोपी शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, इरफान शेख, धीरज वाघमोडे, जयराज सांगे, भीमा मस्के, शिवकुमार चलवादी व कार्यकर्ते उपस्थित होते.