सर्वांचा हिशोब होणार ; देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिला इशारा
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद आता विधानसभेत उमटले आहेत. यावेळी विधानसभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच रोख कोणाकडे? याबाबत चर्चा होऊ लागली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्यामागे कोण आहे? त्याची सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. माझी जरांगे यांच्यासंदर्भात तक्रार नाही. पण जरांगे यांच्या पाठीमागे बोलवतो धनी कोण आहे, ही स्क्रीप्ट काही लोक रोज बोलतात. आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉर रुम कोणी उघडली. ही सर्व माहिती मिळू लागली आहे. सर्व चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Devendra fadnvis | सर्वांचा हिशोब होणार ; सभागृहात दिला इशारा pic.twitter.com/5tswBmgixe
— @prashant katare (@Sinhasan4) February 27, 2024