







अक्कलकोट, मैंदर्गीत कल्याणशेट्टीच दादा ; दुधनी म्हेत्रे साहेबांचीच, मोहोळमध्ये उमेशदादा किंगमेकर
सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिकांपैकी भारतीय जनता पार्टी कडे चार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तीन तीर्थक्षेत्र विकास आघाडी दोन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एक आणि स्थानिक विकास आघाडी एक असे बलाबल विजयी झाले आहे.
यामध्ये अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजी मारली असून
या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला असून मिलन कल्याणशेट्टी यांनी ८,५५२ मतांनी नगराध्यक्ष पद जिंकले आहे. भाजपाचे २२ नगरसेवक विजयी झाले असून काँग्रेसचे २ व शिवसेना शिंदे गटाचा १ नगरसेवक निवडून आला आहे. या निकालामुळे अक्कलकोट नगरपरिषदेत भाजपाचे स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
तसेच मैंदर्गी नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. यावरून कल्याणशेट्टी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
सर्वांचे लक्ष होते ते दुधनी नगरपरिषदेकडे. तिथे मात्र माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे यांनी बाजी मारली असून भाजपकडून दुधनी ताब्यात घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा दुधनी वर सिद्ध झाले आहे.
मोहोळ तालुक्यातील नगरपंचायत निवडणूक यंदा चांगलीच गाजली आहे अनगर नगरपालिके नंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते मोहोळ नगरपालिकेच्या निकालाकडे या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती केली होती उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीचा एकही उमेदवार न देता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना धनुष्यबाणाला पाठिंबा दिला होता.
मोहोळ मध्ये भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी लढत होती पण मोहोळकर यांनी पुन्हा धनुष्यबाणाला साथ देताना सिद्धी वस्त्रे या युवतीला नगराध्यक्ष पदावर विराजमान केले आहे तिथे नागनाथ क्षीरसागर यांच्या सुनबाई यांचा पराभव करण्यात उमेश पाटील यशस्वी झाले नकळत हा भारतीय जनता पार्टीला मोठा दणका राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी दिला आहे त्यामुळे या निवडणुकीत उमेश पाटील हेच किंगमेकर ठरल्याचे दिसून येते.
बार्शी मध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. अनेकांचे लक्ष लागले होते ते अकलूज नगरपालिकेकडे. पण तिथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहिते पाटील गटाने विजय मिळवला. सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा शिवसेनेचा नगराध्यक्ष केला आहे. पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांनी बाजी मारली तर मंगळवेढा सुद्धा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आवताडे या नगराध्यक्ष झाल्या आहेत. करमाळ्यात स्थानिक विकास आघाडीने विजय संपादन केला असून कुर्डूवाडी मध्ये माजी आमदार संजय शिंदे यांना धक्का बसला आहे तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने विजय मिळवला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक निकाल नगराध्यक्ष*
1. अक्कलकोट …. मिलन कल्याणशेट्टी भाजपा
2. मैंदर्गी….. अंजली बाजारमठ …भाजपा
3. बार्शी…. तेजस्विनी कथले… भाजप
4. अनगर….. प्राजक्ता पाटील.. भाजपा
5. दुधनी… प्रथमेश मेहत्रे… शिवसेना शिंदे गट
6. सांगोला.. आनंदा माने….शिवसेना शिंदे गट
7. मोहोळ.. सिद्धी वस्त्रे… शिवसेना शिंदे गट
8. कुर्डूवाडी… जयश्री भिसे… शिवसेना ठाकरे गट
9. मंगळवेढा …. सुनंदा अवताडे…तीर्थक्षेत्र विकास आघाडी
10. अकलूज….. रेशमा अडगळे…शरदचंद्र पवार राष्ट्रवादी
11. करमाळा…. मोहिनी सावंत…स्थानिक विकास आघाडी
12. पंढरपूर…. डॉक्टर प्रणिता भालके…. तीर्थक्षेत्र विकास आघाडी
………………………………………..
पक्षीय बलाबल
भाजपा…04
शिवसेना एकनाथ शिंदे गट…03
तीर्थक्षेत्र विकास आघाडी…02
शिवसेना उद्धव ठाकरे गट..01
राष्ट्रवादी शरद पवार गट…01
स्थानिक विकास आघाडी…01
एकूण ……12
……………………………………….




















