चेतन गायकवाड अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस
सोलापूर:-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या युवक प्रदेश सरचिटणीस पदी चेतन गायकवाड यांची निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालय येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल चेतन गायकवाड यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या पाच वर्षापासून चेतन गायकवाड हे राजकारण व समाजकारण मध्ये सक्रिय आहेत. आपले वडील माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा वारसा घेऊन ते मार्गक्रमण करीत आहेत. युवकांची मोठी फळी चेतन गायकवाड यांच्यासोबत आहे. अत्यंत मितभाषी, संयमी अशा या युवा नेतृत्वाकडे अजित पवार गटाकडून युवक प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस पदी चेतन गायकवाड यांची निवड झाली या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, श्रीनिवास कोंडी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे,पंढरपूरचे फारुक बागवान आदींच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.