सोलापूर : श्री सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. त्यामुळे हजारों कामगार आणि शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. यानंतर अनेक राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी धर्मराज काडादी यांची भेट घेऊन समर्थन दिले आहे. गुरुवारी AIMIM शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी काडादी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कोमारो सय्यद, गाजी जहागीरदार, मोहसीन मैंदर्गीकर, वाहिदा भंडाले यांची उपस्थिती होती.
माध्यमांशी बोलताना शाब्दी यानी चिमणी पाडल्याचा निषेध केला, शहराच्या विकासासाठी विमान सेवा झाली पाहिजे पण एखादा चांगला चाललेला उद्योग बंद करून नव्हे, महापालिकेने कुणाच्या दबावापोटी काम करू नये असे सांगत एम आय एम पक्ष काडादी परिवाराच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.



















