चीनचा बोकड, सात किलोचा कोंबडा अन् बुटकी गाय, म्हैस ; सिध्देश्वर कृषी प्रदर्शनाचे यंदाचे आकर्षण
श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवत असून यंदा प्रदर्शनाचे 54 वे वर्षे आहे. या निमित्ताने होम मैदान येथे दिनांक 21 डिसेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 या 5 दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात 300 स्टॉलचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्पो ग्रुप च्या व्यवस्थापन अंतर्गत भरविण्यात येत आहे. तसेब कृषी संशोधन केंद्र सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्यारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर व मोहोळ विमाग, रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवा उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण, फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केले जाणार आहे.
सदर प्रदर्शन नियोजनबध्द व यशस्वीरित्या व्हावे याकरीता मागील 2 महिन्यापासून याची तयारी करण्यात येत आहे. यामध्ये प्रदर्शनाचे पूर्व तयारी म्हणून सर्व संबंधित विभागाचे दि. 30 ऑक्टोंबर, 13 नोव्हेंबर तसेच दि. 03 डिसेंबर 2024 रोजी श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी संपन्न झाल्या. तरी श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधव, उद्योजक व नागरिकांनी सहभागी होवून कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे सर्व नागरिकांना श्री. सिध्देश्वर यात्रा समिती आवाहन करीत आहे.
1) शेतकऱ्यांना शेतातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती, कृषी यांत्रिकीकरण, दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमिक्षका पालन, फलोत्पादन तसेच कृषी उद्योजक निविष्ठा, नवीन स्टार्टअप व्हर्टिकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे इत्यादी विषयी सविस्तर माहिती पोहचण्यास सुलभ होईल.
2) या कृषी प्रदर्शनामध्ये सोलापूरचे शान असलेली खिलार बैल व गाय प्रदर्शित केले जाणार आहेत. तसेच जगातील अत्यंत दुर्मिळ बुटकी देशी पुंगनूर जातीचे गायी प्रदर्शित केले जाणार आहेत. याकरीता इस्ट गोदावरी आंध्र प्रदेशातून शेतकरी सहभागी होणार आहेत.
) तामिळनाडू बेल्लोर, रोलग तसेच महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, पुणे बाएफ संस्था यावेकडील शेतकयांनी स्वतः तयार केलेले अंदाजे 500 प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणे प्रदर्शित करणार आहेत तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत.
4) दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत कैंट शो व डॉग शो प्रदर्शन होणार असून यावेळी विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 पर्यंत डॉग शो
दुपारी 4.00 से सायंकाळी 6.00 पर्यंत कैट शो
• सायंकाळी 6.00 वाजता डॉग अॅन्ड कैंट फॅन्सी ड्रेस स्पर्धा
5) दिनांक 23 डिसेंबर 2024 राज्यस्तरीय देशी गाय, बैल प्रदर्शन स्पर्धा आयोजन व विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
6) तसेच दिनाक 23 डिसेंबर 2024 रोजी पुष्प प्रदर्शना (फुलांचे प्रदर्शन) चे आयोजन.
7) औद्योगिक प्रदर्शनः सोलापूर जिल्ह्यामधीला कृषि व संलग्न, गारमेंट, टेक्सटाईल, टॉवेल इत्यादी उत्पादित मालाचे प्रदर्शनाचे आयोजन.
प्रदर्शनाचे आकर्षण
> जगातील सर्वात दुर्मिळ बुटकी पुंगनूर गाय
> जगातील सर्वात बुटकी म्हैस (राधा)
> खास चायनाहून आणलेला चायनाचा बोकड
> तब्बल 6 किलो वजनाचा कोंबडा
> 300 हून अधिक शेतीविषयक कंपन्यांचा सहभाग
> लाखो शेतकरी बांधवांची उपस्थिती
> गारमेंट तसेच टेक्सटाईल विभागाची दालने
> भारतातील विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स व शेती अवजारे
> वाहन महोत्सव
> शेतीविषयक प्रक्रिया उद्योग
> महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या, शेतकऱ्यासाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने
> सेंद्रीय शेतीचे विशेष दालन
> पशु पक्षी प्रदर्शन
> पुष्प प्रदर्शन
> 500 हून दुर्मिळ देशी बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री