भरणेमामा आज आहेत सोलापुरात ! जिल्ह्याची बैठक फार्म हाऊसवर तर शहराची रेस्ट हाऊसवर
सोलापूर : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क मंत्री पदावर नक्कीच नियुक्ती झाली आहे. यापूर्वी भरणे मामा यांनी सोलापूरचा धावता दौरा केला होता.
आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
पक्षातील काही माजी आमदार पक्ष सोडून जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. सोलापूर ग्रामीण ची बैठक ही माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माढा तालुक्यातील निमगाव येथील फार्म हाऊस वर सकाळी साडे दहाच्या सुमारास जिल्ह्याची बैठक होणार आहे.
त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास सोलापूर शहरात ते येणार शासकीय विश्रामगृहावर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ते घेणार आहेत. दत्तात्रय भरणे हे सुमारे अडीच वर्ष सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात त्यांचा चांगला संपर्क आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या या संपर्काचा निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल यात शंका नाही.