सोलापुरात दोन वर्षानंतर डॉ नवीन तोतला यांच्यावर गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण
सोलापूर : आईच्या परवानगी शिवाय मुलाला इंजेक्शन देऊन त्यांच्या मृत्यस कारणीभूत ठरलेल्या तोतला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ नवीन तोतला यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात दोन वर्षानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
यात हकिकत अशी की, दि २३/०८/२०२२ रोजी फिर्यादी रहिमतबी हुसेनसाब केन्नीवाले, वय-५० वर्षे, रा- मुपो आळंद ता. आळंद जि. गुलबर्गा यांचा मुलगा यातील मयत जिलानी याला खालेले पचत नसून सतत उलटी होत असल्याने त्यास फिर्यादीने स्वतः उपचाराकरीता तोतला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आरोपीत डॉ तोतला यांनी त्यास अॅडमिट करून घेवून त्यास फिर्यादीच्या परवानगीशिवाय दोन इंजेक्शन देवून यातील अरोपीत यांनी फिर्यादीचा मुलगा जिलानी (मयत) यास निष्काळजीपणाने उपचार करून त्यांचे मृत्युस कारणीभूत ठरला आहे.
दरम्यान या प्रकरणात आधार हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी परेश मनलोर यांनी स्पष्टीकरण दिले की, मयत मुलाला सुरुवातीला तोतला हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याच्यावर इंडॉस्कॉपी करताना आत मध्ये घशात जखम झाली त्यानंतर संबंधित डॉक्टर तोतला यांनी त्याला दोन इंजेक्शन दिली. प्रकृती गंभीर झाल्यानंतर आधार हॉस्पिटलकडे हलवले परंतु त्यानंतर आमच्या स्टाफने तपासले असता तो युवक मृत झाला होता, त्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच त्या मुलाचा मृत्यू झाला होता असे मनलोर यांनी सांगितले.