राम सातपुते धडाडीचा आणि काम करणारा कार्यकर्ता, त्यांना लोकसभेत पाठवा ; पंडित भोसले यांचे आवाहन
राम सातपुते एका ऊसतोड मजुराच्या घरी जन्मलेला सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असून प्रचंड धडपडीचा, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी काम करणारा माणूस आहे. माळशिरस तालुक्यात आपण त्यांचे काम पाहिले आहे, हजारो शस्त्रक्रिया करून त्यांनी गरिबांना जीवनदान दिले आहे, अशा नेतृत्वाला सोलापूरच्या विकासासाठी लोकसभेत पाठवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे निवृत्त कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांनी केले.
भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पंडित भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी भोसले कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.
या दरम्यान युवा नेते प्रणव परिचारक यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सशक्त, समृद्ध आणि विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी सोलापुरातून सातपुते यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचा निर्धार केला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, हरिष गायकवाड, राजश्री भोसले, पंढरपूरचे उपसभापती सिताराम नागणे, सुभाष मस्के, सुनिल भोसले, माऊली हळणवर , संतोष घोडके, बबन जाधव, किसना भुताडे, विनोद गायकवाड, गणेश पंडित, दीपक पंडित, हेमंत दाडगे, अनंत वाघ, बाळासो बुपनेर, हिरालाल रोख, सतीश घाडगे, दादा घाडगे, लक्ष्मण शिंदे, अर्जुन कोळी, समाधान जाधव, रामभाऊ दिघे, जयसिग भुसनर, संतोष भिंगारे, रामभाऊ गायकवाड, महादेव शिंदे तसेच अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.