प्रणिती शिंदे, तुम्ही जिल्ह्यात ज्या रस्त्यांनी फिरता ते सर्वच रस्ते मोदींनी बांधले ; राम सातपुते यांनी विकासाचा पाढाच वाचला ; तुम्ही काय केले
सोलापूर : काँग्रेसच्या उमेदवाराने मागील दहा वर्षांमध्ये मोदींनी सोलापूरला काय दिले असा प्रश्न उपस्थित करतो पण मोदींनी दहा वर्षात काय दिले याचा पाढाच सातपुते यांनी वाचला. अनेक विकास कामे सांगत तुम्ही काय केले असा प्रती सवाल त्यांनी केला. तुम्ही अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, विजापूरला जाता ना तो रस्ता मोदींनी केला या शब्दात प्रणिती शिंदे यांना सातपुते यांनी टोला हाणला.
आसरा चौकातील किल्लेदार मंगल कार्यालय येथे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर विधानसभा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, युवा नेते मनिष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, सरचिटणीस शशिकांत चव्हाण, नियोजन समिती सदस्य डॉ हविनाळे, अंबिका पाटील, अप्पासाहेब पाटील, मेनका राठोड, संगीता जाधव, विशाल गायकवाड, राम जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बूथ वॉरियर्स यांची उपस्थिती होती.
सुभाष देशमुख म्हणाले, आपल्या दक्षिण तालुक्याने मुख्यमंत्री दिला, पण किती विकास केला, 2014 पूर्वीचा काळ आठवा आणि आज 10 वर्षातील विकास पहा, हेच तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी मतदाराला सांगितले पाहिजे. घरी येतील, जेवण करतील, चहा पितील, खांद्यावर हात ठेवतील, नंतर गायब, हे सर्व झूठ आहे ते आपले नाहीत अशा पासून सावध रहा, असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, गरीब, कष्टकरी, महीला, युवक यांच्यासाठी ज्या योजना राबवल्या त्या जनतेला सांगा अशा सूचना केल्या.