सातपुतेंचा ‘राम’ महामानवाच्या अस्थींसमोर नतमस्तक ; राष्ट्रवादीच्या चंदनशिवे यांनी केले जोरदार स्वागत, जेसीबीतून पुष्पवृष्टी
भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी आपल्या भागात अतिशय जोरदार असे स्वागत केले सातपुते यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली या स्वागताने सातपुते भारावून गेल्याचे चित्र होते.
यावेळी बुधवार पेठ मिलिंदनगर भागातील अस्थिविहार प्रेरणाभूमी येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्मारकाला भेट देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले
समाजातील वंचित, दलित वर्गाला आज जे हक्क, संधी मिळाली त्यांचा अक्षरशः उद्धार झाला आहे, तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य फक्त दलितोद्धारापुरतेच मर्यादित नसून त्यांनी महिलांचे हक्क, कामगारांचे हक्क अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण काम केले आहे. त्यांच्या कामाचा हा आदर्श माझ्यासारख्या अनेक तरुणांना नेहमीच प्रेरणा देत आला आहे. आज त्यांच्या कार्यासमोर नतमस्तक होताना मनोमन त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त होत असल्याच्या भावना सातपुते यांनी बोलून दाखवल्या.
यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मनीष देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, गौतम चंदनशिवे , बाप तळभंडारे, सुहास सावंत, चाचा सोनवणे, प्रभाकर बनसोडे, गणेश बनघट्टे, अविनाश भडकुंबे, मनोज थोरात, गौरव कांबळे, एडवोकेट विशाल मस्के ,विवेक जाधव धम्मपाल मैंदर्गीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.