स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रणिती शिंदे यांच्या अक्कलकोट दौऱ्याला सुरुवात ; जेसीबीतून पुष्पवर्षाव करून अक्कलकोटमध्ये जोरदार स्वागत
सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी आपल्या अक्कलकोट दौऱ्याला सुरुवात केली प्रारंभी त्या श्री स्वामी समर्थांचे त्यांनी दर्शन घेऊन मंदिरात पूजा केली.


यावेळी सोबत माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, युवा नेत्या शितल म्हेत्रे, युवा नेते प्रथमेश म्हेत्रे, मनोज यलगुलवार यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने सोबत आहेत.
दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील गावोगावी उमेदवार प्रणिती शिंदे तसेच म्हेत्रे परिवारावर ग्रामस्थांनी जेसीबीतून पुष्प वर्षाव करत जंगी स्वागत केले.
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…”या शब्दात एवढी ताकद आहे की, कोणतेही आव्हान ऊचलण्यासाठी एक प्रकारची ताकद यामुळे मिळते. नक्कीच स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अक्कलकोटसह सोलापुर लोकसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले.
अन्यायी सरकारला तडीपार करण्यासाठी प्रणितीताई शिंदे यांना अक्कलकोट तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.





















