“ताई बस खासदार होनी चाहिए” ! उम्मीेदवार दोगे तो एमएलए का सपना कैसा पुरा होगा भाई !
सोलापूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत. त्यांनी मागील तीन विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून विजय मिळवला आहे त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्ये वर अनेक नेत्यांचा डोळा आहे.
2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीमध्ये शहर मध्य मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एमआयएम पक्षाला सर्वाधिक जास्त अपेक्षा आहेत. जर प्रणिती शिंदे या खासदार झाल्या तर शहर मध्य मधून यंदा एमआयएम पक्षाचा आमदार निश्चित होईल अशी अपेक्षा एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यासाठी “ताई बस खासदार होनी चाहिए”! अशी चर्चा यापूर्वी अनेक वेळा एमआयएमच्या नेत्यांमधून ऐकण्यास मिळाली.
एमआय एम पक्ष महाराष्ट्रातील काही जागा लढवणार आहे त्यामध्ये सोलापूरचा ही समावेश असल्याचे समजते. सोलापूरच्या एमआयएमकडे तिघांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका माजी आमदाराचाही समावेश असल्याचे वर्तमानपत्रातून वाचण्यास मिळाले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अससुद्दिन ओवेसी यांना सोलापूरला रोजा इफ्तार पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या सोलापूर दौऱ्यानंतरच उमेदवार निश्चित केला जाईल असे सूत्रांकडून समजले.
देशातील एकूणच वातावरण पाहता सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन ते अडीच लाख मतदार असणारा मुस्लिम समाज यंदा कुणाच्या पाठीशी राहतोय हे सुद्धा तितकेच महत्वाचे असून जर एमआयएम पक्षाने उमेदवार दिला तर निश्चितच मत विभाजन झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.