बैठक लोकसभेची, कार्यकर्त्यांनी मागणी केली विधानसभेची ; मालक पुन्हा दक्षिणकडेच या,
सोलापूर : दिलीपराव माने युवा मंचच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका ठरवण्याचा दृष्टीने माजी आमदार दिलीप माने यांनी सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील मांगल्य मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक लोकसभा निवडणुकी
मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक यावेळी उपस्थित होते, महिला ही तितक्याच मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तब्बल एक तास कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली, त्यामध्ये युवक होते, सरपंच होते, शिक्षक होते, वकील होते, शेतकरी होते, राजकारणी होते, महीला यांनीही आपली मते मांडली. यामध्ये राजशेखर पाटील, बाळासाहेब मोरे, प्रकाश काशीद
अनिरुद्ध पवार, प्रेम राठोड, सिद्धया कोळी, सतीश दरेकर, अँड भरत आकेन, मच्छिंद्र मोरे, संजय बनसोडे, प्रथमेश कासार, शैलेजा राठोड, वैशाली शहापूरे, सचिन चौधरी, विठ्ठल म्हेत्रे, सिद्धाराम कटगेरी, आप्पासाहेब काळे यांचा समावेश होता.
लोकसभेची निवडणूक लागली आहे, निर्णय घ्यावा लागणार किती दिवस आपण गप्प बसायचे, तुम्ही म्हणजेच आमचा पक्ष, तुम्ही जो झेंडा हाती घ्याल तो आम्ही हाती घेऊ, ज्या उमेदवाराला सांगाल तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दिलीप माने यांनी पुन्हा दक्षिण विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढावी आणि त्यासाठी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करावा दक्षिण सोलापूर मतदार संघ हा दहा वर्षे वनवासात गेला आहे, हा त्या आमदाराला लोक वैतागले आहेत तुमच्यामुळेच सैफुल भागाचा विकास झाला, त्यामुळे तुम्ही पुन्हा काँग्रेस पक्षात यावे आम्ही तुम्हाला पन्नास हजाराचे मताधिक्य देऊन विजयी करू अशी मागणी करताच कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराचे आपण काम करणार आहोत त्यांच्याकडून दक्षिण विधानसभेच्या तिकिटाचे निश्चिती पण घ्यावी अशी ही मागणी समोर आली.