चिंचोली एमआयडीसीत गॅस स्फोटात विलास पवार यांचे घर बेचिराग ; माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सोलापूर : 7/3/2024 रोजी विलास बाबुराव पवार व त्याचे कुटुंबीय कार्यक्रम साठी बाहेर गावी असताना रात्रीच्या सुमारास घरातील महावितरणचे मीटर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने त्यापासून निर्माण झालेली आगीची ठिणगी मीटर खाली असलेल्या पलंगावर पडल्याने पलगावरील बेडशीट व गादी मोठ्या प्रमाणात पेट घेऊन पलंगावरील बेडशीट, गादी,व कापडाला आग लागली.
सदर आग विझवण्यासाठी घरात कोणी नसल्याने आग घरात पसरून जाऊन घरामध्ये असलेले घरगुती गॅस टाकी पर्यंत गेल्याने मोठा स्फोट होऊन संपूर्ण घर बेचीराग झाले आहे. त्यामुळे विलास बाबुराव पवार याचे संसार उपयोगी वस्तू, मौलवान वस्तू, अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे, रोख दहा हजार रुपये, वापरण्याचे कपडे जळून खाक झाले आहेत. त्यांचे घर उघड्यावर पडले असून वापरायला कपडे सुद्धा नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्यांनी सदरची बाब माजी नगरसेविका तथा भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य राजश्री चव्हाण यांना समक्ष भेटून माहिती दिली.
त्याची दखल घेत तात्काळ जिल्हाधिकारी सोलापूर व समाज कल्याण सहायक आयुक्त सोलापूर यांना निवेदन देऊन सदर पीडित विलास बाबुराव पवार राहणार काठी चिंचोली तालुका मोहोळ मो.न.8177862906 यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत करावी व त्यांचे पुनर्वसनासाठी जलद गतीने कार्यवाही करावी असे निवेदन देण्यात आले. त्यावेळी विलास बाबुराव पवार व त्यांचे कुटुंब उपस्थित होते. तसेच सदर असहाय कुटुंब पिढीताना दानशूर व्यक्तीने, संस्थांना आर्थिक सहाय्य मदत करण्यासाठी आवाहन केले आहे.