सोलापूर झेडपी कर्मचाऱ्यांच्या ‘नेतेगिरीला’ आला स्टे ; जिल्हा परिषद पतसंस्थेच्या निवडणुकीला तूर्त स्थगिती
या निवडणुकीत 17 जागांसाठी 79 उमेदवारांनी 92 अर्ज दाखल केले होते त्या अर्जांची छाननी मंगळवारी झाली. त्यामध्ये 3 अर्ज बाद झाले. 14 अर्ज हे डबल असल्याने 17 जागांसाठी 75 अर्ज शिल्लक राहिले.
“नामनिर्देशन हा टप्पा सुरू झालेल्या तसेच” हा शब्द वगळला त्यामुळे ही निवडणूक 31 मे 2024 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्रमांक एक च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला आहे त्या टप्प्यात स्थगिती आदेश आला आहे. या निवडणुकीला तीन महिने स्थगिती आल्याने जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या नेतेगिरीला नकळत स्टे मिळाल्याची चर्चा रंगली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तीन कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मोठी, नावाजलेली पतसंस्था म्हणून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्रमांक एक यांचे नाव आहे. या पतसंस्थेवर अनेक वर्षांपासून एकाच गटाचे वर्चस्व राहिले आहे. पतसंस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी अनेक संघटना एकत्रित येऊन दर पाच वर्षाला प्रयत्न करतात परंतु त्यांचा प्रयत्नाला यश मिळत नाही.
या पतसंस्थेची निवडणूक जवळ आली की जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांच्या नेतेगिरीची चर्चा चालू होते. काही दिवसांनी जिल्हा परिषद विधी विभागाचे राजेश देशपांडे हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या कार्यक्रमात नेता कसा असावा? यावर बराच चर्चा रंगली. या नेतेगिरीची चर्चा या निवडणुकीमध्ये सुरू झाली होती.
यंदा काहीही करून परिवर्तन होणारच या अविर्भावात असलेल्या काही नेत्यांना तर चेअरमन पदाचे स्वप्न पडण्याचे पाहायला मिळाले. पण शासनाने आहे त्या टप्प्यात या निवडणुकीला स्थगिती दिल्याने अनेकांचा हिरमोड झाला.