Friday, January 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेचे 48 कोटीचे अंदाजपत्रक ; ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 50 लाखाची तरतूद, आशा क्लिनिक नवी योजना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 March 2024
in Administration, solapur
0
ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेचे 48 कोटीचे अंदाजपत्रक ; ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 50 लाखाची तरतूद, आशा क्लिनिक नवी योजना
0
SHARES
315
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेचे 48 कोटीचे अंदाजपत्रक ; ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 50 लाखाची तरतूद, आशा क्लिनिक नवी योजना

 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी सन 2024 25 या सालातील जिल्हा परिषदेचे 48 कोटी 11 लाखाचे अंदाजपत्रक सोमवारी दुपारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सादर केले. ग्रामीण भागातील दिव्यांग, मागासवर्गीय विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना अर्थिक मदत करणे यासाठी अंदाजपत्रकात 50 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी दुपारी दोन वाजता आपल्या बजेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले त्यानंतर सभागृहात हे बजेट सादर करण्यात आले. सन २०२३-२४ चे मूळ अंदाजपत्रक रक्कम रु.४५०६,६८ लक्ष चे होते. सन २०२४-२५ च्या मूळ अंदाजपत्रकात रक्कम रु.३०४.९९ लक्ष इतकी वाढ करुन रक्कम रु.४८११.६७ लक्ष चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

सन २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रकातील विभागनिहाय योजना खालीलप्रमाणे आहेत.

*अ प्रशासन:-

कर्मचा-यांचे कामकाजात प्रशासकीय गतिमानता आणनेसाठी व गुणवत्ता वाढीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करणेसाठी तरतूद करणेत आलेली आहे.

* कृषि विभाग–

कृषि विभागासाठी मागील वर्षाच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.२.०० लक्ष इतकी वाढ करुन कृषिसाठी एकूण र.रु.३७२.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

• कृषि अभियांत्रिकी योजनेंतर्गत ट्रॅक्टर चलित औजारे, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, रोटरी टिलर यासाठी रक्कम रु.१००.०० लक्ष इतकी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. जेणेकरुन सोलापूर जिल्हयातील शेतक-यांना आधुनिक औजारांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, याची काळजी घेतली आहे.

• शेतकरी व पशुपालक यांचेसाठी कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर या सुधारित औजारांचा वापर व्हावा, म्हणून रक्कम रु.११०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

*पशुसंवर्धन विभाग
पशुसंवर्धनसाठी एकूण ३३६०४ इतकी तरतूद केलेली आहे

• पशुंच्या दुग्ध वाढीसाठी जीवनसत्व औषध पुरवठा करणेसाठी रक्कम 40 लाख तर, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रम अंतर्गत 30 लक्ष,

• आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी व शेतमजूर यांना चार शेळया व एक बोकड वाटप योजनेसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष,

• पशुपालकांना मिल्कींग मशीन पुरविणेसाठी रक्कम रु.३०.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.

* सार्वजनिक आरोग्य विभाग:-

आरोग्य विभागासाठी एकूण र.रु.३९७.३१ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

• आरोग्य विभागासाठी योजना अंतर्गत आशा क्लीनिक ही योजना घेण्यात येत असून त्यामध्ये प्रत्येक आशा सेविकांना B.P. मोजणे मशीन, शुगर मोजणे मशीन, वजनकाटा, बैडेन, वाफ द्यायचे मशीन (Nebuliser) अंग शेकायची पिशवी असे कीट द्यावयाचे असून त्यामधून आशा क्लिनिक तयार होईल, यासाठी रक्कम रु.२४.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

• प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये Labour Room चे आधुनिकीकरणासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधे खरेदीसाठी र.रू.१००.०० लक्ष,

• श्वानदंश लस, सर्पदंश लस खरेदीसाठी रक्कम रु.३०.०० लक्ष,

• जिल्हास्तर/तालुकास्तर/प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर/उपकेंद्र स्तर बीज, पाणी, दुरध्वनी, इंधन, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जन वाहन इंधन साठी रक्कम रु.१००.०० लक्ष

• ग्रामीण जनतेला असाध्य रोगावरील उपचारासाठी अर्थसहाय्य यासाठी र.रु.२०.०० लक्ष,

• प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्राकडील जैव घनकचरा विल्हेवाट लावणे यासाठी र.रु.३०.०० लक्ष,

* समाजकल्याण विभाग :-

समाजकल्याण विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.३३.७७ लक्ष इतकी वाढ करुन समाजकल्याण विभागासाठी एकूण र.रु.४७५.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

• ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे यासाठी रक्कम रु.१५.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

• ग्रामीण भागातील मागासवर्गीय जनतेच्या विकासासाठी ५ व ७.५ HP विद्युत मोटार पुरविणे साठी रक्कम रु.३०.०० लक्ष,

• इ.५वी ते ९वी च्या मागासवर्गीय मुलामुलींना सायकली पुरविणे साठी रक्कम रु. २०,०० लक्ष,

• मागासवर्गीयांना शेळीपालन गट अनुदान रक्कम रु.३०.०० लक्ष,

• ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी रक्कम रु.४००० लक्ष,

• व्यवसाय व तांत्रिक प्रशिक्षण योजनांतर्गत Tally (संगणक) प्रशिक्षणासाठी रक्कम रु.२५.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.
• अपंग व्यक्तींना स्वयंचलित सहायभूत साधने व तंत्रज्ञान करीता अर्थसहाय्य देणे या योजने अंतर्गत ई-रिक्षासाठी रक्कम रु. ४९.०० ला,

• अपंग व्यक्तींना उद्योजकता व कौशल्य विकास शिबीर आयोजित करणेसाठी रक्कम रु.२०,०० लक्ष,

• अपंग व्यक्तींना शेळीपालन गट अनुदानासाठी रक्कम रु.४२.०० लक्ष,

• ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी एपर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे यासाठी रक्कम रु.२०.०० लक्ष,

• दिव्यांग मुलांना विशेष उच्च दर्जेचा उपलब्ध करुन देणेसाठी अनुदान रक्कम रु.२५.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.

* महिला व बालकल्याण विभाग :-

महिला व बाल कल्याण विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.४६.०१ लक्ष इतकी वाढ करुन महिला व बाल कल्याण विभागासाठी एकूण र.रु.३६७.०७ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

• ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींना आर्थिक मदत करणे यासाठी रक्कम रु.१५.०० लक्ष इतको तरतूद केलेली आहे.

• ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरविणे यासाठी रक्कम रु.८०.०० लक्ष,

• अंगणवाड्यांना विविध साहित्य/ शैक्षणिक उपयोगती साहित्य पुरविणे यासाठी रक्कम रु.८०.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.

* ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

:- ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.६१.०० लक्ष इतकी वाढ करुन पाणी पुरवठा विभागासाठी एकूण र.रु.२९१.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

* लघु पाटबंधारे:-

लघु पाटबंधारे विभागासाठी एकूण र.रू.२००.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

* शिक्षण विभाग :-

शिक्षण विभागासाठी एकूण र.रु.५४०.१८ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

• विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेकरिता शेक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दणे, खडूमुक्त शाळा, White Board Science Wall यासाठी रक्कम रु.७५.०० लक्ष,

• जि.प. शाळांमध्ये बेंच खरेदीसाठी व क्रिडा साहित्य उपलब्ध करुन देणेसाठी प्रत्येकी र.रु.२०.०० लक्ष,

• जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या देखभाल, दुरुस्ती, अमृत रसोई तयार करणे तसेच शाळेत बीज बचत होणेसाठी सोलर युनिट बसविणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी रक्कम रु.२५०.०० लक्ष इतकी भरीव तरतूद करणेत आलेली आहे.

* बांधकाम विभाग :-

बांधकाम विभागासाठी र.रू.११०५.०१ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• यामध्ये प्रामुख्यान जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी व्यापारी गाळे बांधणेकामी रक्कम रु.५०.०० लक्ष इतकी तूरतूद केलेली आहे.

Tags: Budget zpCEO Manisha AwhaleZilha parishad solapur
SendShareTweetSend
Previous Post

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप झाले जॉईन ; सीईओ आव्हाळे यांनी भेटीत दिल्या या सूचना

Next Post

सोलापुरातून मनिष देशमुख यांच्या समवेत युवा मोर्चा कार्यकर्ते नागपुरात दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरातून मनिष देशमुख यांच्या समवेत युवा मोर्चा कार्यकर्ते नागपुरात दाखल

सोलापुरातून मनिष देशमुख यांच्या समवेत युवा मोर्चा कार्यकर्ते नागपुरात दाखल

ताज्या बातम्या

“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

16 January 2026
पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

16 January 2026
भाजपच्या कसबा गडाला काँग्रेसचा सुरुंग ; गोदावरी मोकाशी देणार धक्का

भाजपच्या कसबा गडाला काँग्रेसचा सुरुंग ; गोदावरी मोकाशी देणार धक्का

14 January 2026
भाजपच्या भांडणात आनंद दादा पॅनल काढणार ; विकासकामे अन् पर्सनल अटॅचमेंट जमेची बाजू

भाजपच्या भांडणात आनंद दादा पॅनल काढणार ; विकासकामे अन् पर्सनल अटॅचमेंट जमेची बाजू

14 January 2026
भाऊ अन् भाईसाठी सब कुछ ; काँग्रेसच्या सुशीलकुमारने केला प्रामाणिक प्रचार

भाऊ अन् भाईसाठी सब कुछ ; काँग्रेसच्या सुशीलकुमारने केला प्रामाणिक प्रचार

13 January 2026
ओवेसी गेले अन् पठाण पण गेले ; नई जिंदगीतच राहणार फक्त तौफिक पैलवान

ओवेसी गेले अन् पठाण पण गेले ; नई जिंदगीतच राहणार फक्त तौफिक पैलवान

13 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीची ती ‘दिदी’ आपल्या वडिलांसोबत भाजपात दाखल

दादांच्या राष्ट्रवादीची ती ‘दिदी’ आपल्या वडिलांसोबत भाजपात दाखल

12 January 2026
कुठनं आणलं रे ह्याला ! सोलापुरात पाकिस्तान असल्याची भाषा ; ह्यानं दिलीप मानेंचीच घालवली

कुठनं आणलं रे ह्याला ! सोलापुरात पाकिस्तान असल्याची भाषा ; ह्यानं दिलीप मानेंचीच घालवली

12 January 2026

क्राईम

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

Our Visitor

1967545
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group