झेडपीतील रुपनरच्या ‘प्रताप’ वर सीईओ मनीषा आव्हाळे यांचा ‘प्रहार’ ; काढली शोकास नोटीस
सोलापूर : जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्रप्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी, शहर संघटक जमीर शेख यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या केबिन समोर आणून बसवले.
प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती परंतु मागील दोन महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचे प्रहार संघटनेच्या निदर्शनास आले.
साडेचारच्या सुमारास सीईओ आव्हाळे या कार्यालयात आल्या. त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली त्यांनाही अतिशय वाईट वाटले पेन्शनचा विषय असल्याने त्या रुपनर यांच्यावर चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्यासमोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याचा सूचना केल्या. त्यानंतर मंजूर पेन्शन चा पेपर स्वतः सीईओ यांनी कार्यालयाबाहेर येऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिला.
दरम्यान प्रहारचे जमीर शेख यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालय अध्यक्ष रुपनर यांच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत जरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असली तरी जोपर्यंत त्यांचा निलंबन होत नाही तोपर्यंत प्रहार शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे.