रामदास आठवले यांची ‘सोलापूर व शिर्डी’ची मागणी ; भाजप चिन्हावर लढवणार का? काय म्हणाले आठवले
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत रिपाइंला सोलापूर व शिर्डी या दोन जागा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात केली. शासकीय विश्रामगृहात आठवले हे पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात महायुती मध्ये तीन पक्षच असा कायम उल्लेख होतो परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सुद्धा महायुतीमध्ये आहे. आम्हाला विसरून चालणार नाही, त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला सोलापूर आणि शिर्डी या दोन जागा मिळाल्याच पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली. सोलापुरातून राजा सरवदे आणि शिर्डीतून मी स्वतः निवडणूक लढवेन असे सांगताना पत्रकारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला.
तेव्हा ते म्हणाले महायुतीतील राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच पक्षाचे चिन्ह मिळाले आहे त्यामुळे ते भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीत आमचा पक्ष सुद्धा आमच्या चिन्हावर निवडणूक लढवेल आणि भाजपच्या चिन्हावर लढवणार नाही असा खुलासा आठवले यांनी केला.