सोलापूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी पाच दिवस करणार फुल्ल जल्लोष
सोलापूर दि.19(जिमाका):-महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय दिनांक 22 डिसेंबर 2023 अन्वये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविन्यापुर्ण उपक्रम/कार्यक्रम यांचे आयोजन पर्यटन विभामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चालेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात पाच दिवसाचे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती कार्यक्रम दि. 21 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजित केले आहे. सदरचे कार्यक्रम दोन टप्यामध्ये होणार आहे. या महासंस्कृती महोत्सवामध्ये रंगमंचावरील कार्यक्रम महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचरित्रावर आधारित लोककलेतील विविध प्रकार व प्रदर्शनीय दालने इ. कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सुंदर माझी शाळा ही कवितेची सांगीतिक मैफिल तसेच मधुरा वेलणकर यांचा अभिनयातून व नाट्यसंगीतातून भाषेचा रंजक इतिहास दर्शविणारा कार्यक्रम, मधुरव-बोरु ते ब्लॉग हे आहेत. सुंदर माझी शाळा हा कार्यक्रम सांगोला, करमाळा, अकलूज याठिकाणी होणार आहे. तसेच दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पंडित भीमन्ना जाधव यांचा सुंद्री वादनाचा कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण- 1. शिवछत्रपती रंगभवन, सोलापूर येथे दि. 21 फेब्रुवारी 2024 वेळ दुपारी 4.00 ते रात्री 10.00 पर्यंत व दि. 22 फेब्रुवारी 2024 वेळ सकाळी 10.00 सायं 6.00 पर्यंत असे दोन दिवस कार्यक्रम होतील. तर 2. सिटी एक्जीबिशन सेंटर, सोलापूर येथे दि. 23 फेब्रुवारी 2024 ते दि. 25 फेब्रुवारी 2024 असे तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत. 1. सांस्कृतिक कार्यक्रम वेळ सायं 6.00 ते रात्री 10.00 पर्यंत. 2. प्रदर्शन दालने- वेळ सकाळी 10.00 ते रात्री 8.00 पर्यंत
सोलापूर शहरातील शिवछत्रपती रंगभवन व सिटी एक्जीबिशन सेंटर या दोन ठिकाणी महासंस्कृती महोत्सव अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत शिवछत्रपती रंगभवन येथे दोन दिवस तर उर्वरित तीन दिवस सिटी एक्जीबिशन सेंटर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी महासंस्कृती महोत्सव अंतर्गत उपरोक्त ठिकाणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे.