सालाबाद प्रमाणे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने दिवाळी निमित जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, यशवंत नगर, विकास गंगा निवासस्थान या ठिकाणी कार्यरत खाजगी कंत्राटी सुरक्षा रक्षक व स्वच्छता करणारे सर्व कर्मचारी अशा ४० लोकांना दिवाळीचे साहित्य व सुगंधी वस्तूचे वाटप ज्यामध्ये 25 किराणा व सुगंधी वस्तूंचा समावेश आहे अशा किटचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हळे यांच्या हस्ते व मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद कर्मचारी युनियन प्रत्येक वर्षी दिपावली फराळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करते हा फारच स्तुत्य उपक्रम आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषद कर्मचारी युनियन फक्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अडचणी मांडते असे नाही तर सफाई कामगार व सिक्युरिटी कर्मचारी यांचेशी संवेदनशील व आपुलकीने दिवाळी आनंदात साजरी करण्याचे भावना आमचे कर्मचारी ठेवतात हे निश्चित कौतुकास्पद आहे अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, सूत्र संचालन डॉ.एस पी.माने, आभार अध्यक्ष तजमुल मुतवली यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे, आरती माढेकर, सनाबेगम कर्जगी, सविता काळे, सविता मिसाळ, लक्ष्मी शिंदे, राजेश्री कांग्रे, वर्षा औदूर्ती, श्रीशैल देशमुख, त्रिमूर्ती राऊत, विलास मसलकर, राकेश सोडी, रोहित घुले, संतोष शिंदे, रवी करजगी, अभिमन्यू कांबळे, राजीव गाडेकर, शेखर जाधव, रेवणसिद्ध म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले.