महादेव कोगनुरे पुन्हा एकदा जळीतग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला गेले धावून
दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा येथील बगले कुटुंबीयांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले होते. त्यात सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी घरातील ज्वारी, गहू, खते व बि- बियाणे आदी इतर साहित्याची मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच एम के फाउंडेशन च्या वतीने त्वरित दखल घेऊन जळीतग्रस्त नागनाथ बगले व कुटुंबीयांची भेट घेऊन घर उभारणीसाठी आर्थिक मदत देऊन आधार दिला आहे. खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधारा बरोबरच आर्थिक मदतीची गरज असते. म्हणून एक सामाजिक बांधीलकी जपत महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबियांना नेहमीच मदतीचे हात देऊन एक माणुसकी जपण्याचे काम ते करत असतात.
सोलापूर जिल्ह्यात कोठेही जळीतग्रस्ताची घटना घडल्यास एम के फाउंडेशन च्या वतीने तात्काळ दखल घेऊन मदत पोहोचवली जाते. आज माळकवठा येथील जळीतग्रस्त कुटुंबियांच्या बाबतीत ही महादेव कोगनुरे यांनी दाखवलेल्या माणूसकी बद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.
याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, सिद्धाराम बगले, ग्रामपंचायत सदस्य आनंदकुमार थोरात, यशवंत वाघमोडे, दत्ता म्हेत्रे, ओमकार स्वामी, माळकठा पोलीस पाटील वर्षाराणी बगले, पोलीस पाटील धर्मराव कोळी, पोलिस पाटील अशोक पुजारी, धनराज कोळी, महादेव कोळी, जालिंदर माशाळे, बसीर नदाफ, प्रज्वल प्रचंडे, विनोद गव्हाणे, राहुल हेरडे, सागर मदने, अविनाश तोडकरी, विष्णू कळमरे, हिमेश सगरे, गजानन मिरेखोर आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.