दिलीप स्वामी संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ; गुरुवारी घेणार पदभार
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती देण्यात आले आहे तब्बल साडेसात महिन्याच्या प्रतीक्षा नंतर दिलीप स्वामी यांना राज्य शासनाने चांगल्या पदावर बसवले आहे. ही पोस्टिंग होताच सोलापुरातून दिलीप स्वामी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अडीच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केल्यानंतर त्यांच्या जागेवर मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली होती परंतु दिलीप स्वामी यांना पोस्टिंग देण्यात आली नाही.
तब्बल साडेसात महिने त्यांना वाट पाहावे लागले शेवटी अतिशय चांगल्या पदावर त्यांना शासनाने नियुक्ती दिली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये काम करताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले विविध संकल्पना समोर आणल्या त्यामधील काही उपक्रम आणि संकल्पना राज्य शासनाने अवलंबल्या. जिल्ह्यात आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभागामध्ये भरीव काम त्यांनी केले तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका दिलीप स्वामी यांनी पार पाडली.