कुलश्रेष्ठ कंपनीचे कार्य कौतुकास्पद :- शांभवी कल्याणशेट्टी ; होम मिनिस्टर ची मानकरी ठरली कुंभारीची सुजाता जडगे
कासेगाव :— कासेगाव येथील कुल श्रेष्ठ महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य कौतुकास्पद असून महिला सक्षमीकरण व महिला एकीकरणांमध्ये या कंपनीचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे कुलश्रेष्ठ महिला शेतकरी उत्पादक कंपनीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू,महिलांसाठी विविध स्पर्धा,महिला मेळावा कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. येणाऱ्या काळात आपण या कंपनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या कंपनीच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्या साठी प्रयत्न करणार असून महिलांना फक्त चूल आणि मूल हेच अगोदर पाहावे लागत होते परंतु आता तो काळ राहिला नसून महिला या स्वावलंबी होऊन उद्योगाकडे वळल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हळदीकुंकू समारंभात नारी शक्तीचा ही गौरव करण्यात आला. महिलांसाठी नवनवीन उद्योग आमच्या कंपनीमार्फत आम्ही महिलांपर्यंत पोहोचून त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करणार असून येणाऱ्या काळात महिला सबलीकरण हे मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी कंपनीचे चेअरमन राजश्री येणगुरे यांनी सांगितले.
सोलापूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग प्रस्तुशास्त्र तज्ञ प्रवीण खारे यांनी सांगितले की, महिलांनी आरोग्यविषयक बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन आहारात वेगवेगळ्या पालेभाज्यांचे सेवन करून आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले. तर महिला भाजपा अध्यक्ष अंबिका पाटील यांनी सांगितले की कुलश्रेष्ठ महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य पाहून आपल्याला खूप आनंद झाला असून येणाऱ्या काळात आपणही या कंपनीच्या योगदानासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी घेण्यात आलेल्या महिलांसाठीच्या विविध स्पर्धेत कुंभारी येथील सुजाता श्रीशैल जडगे यांनी होम मिनिस्टर मध्ये प्रथम क्रमांक घेऊन पैठणी साडी व सन्मान चिन्ह देण्यात आले. होम मिनिस्टर द्वितीय क्रमांक मनीषा दयानंद वाडकर तृतीय क्रमांक प्रेमा सिद्धू करपे तर यावेळी लिंबू चमचा पोत्यातील उडी रांगोळी कबड्डी खो-खो तळ्यात मळ्यात आधी विविध स्पर्धेतील विजेत्यांना व पन्नास महिलांना उत्कृष्ट व आदर्श महिला पुरस्कार शांभवी कल्याण शेट्टी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. व यावेळी उज्वला गॅस योजनेतून 25 लाभार्थ्यांना गॅस वाटप ही कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांनीही या महिला स्पर्धेतील विविध स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेतला.
डॉक्टर प्रवीण खारे, महिला आघाडीच्या अध्यक्ष अंबिका पाटील, सुरेखा राठोड, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, संभाजी चौगुले, उळ्याचे उपसरपंच नेताजी खंडागळे, डॉ प्रवीण खारे, राजकुमार पाटोळे, मधुकर चिवरे, सुरेखा राठोड, श्रीमंत हक्के व मुस्ती बोरामणी संगदरी कासेगाव उळे उळेवाडी बक्षीहिपरगे मुळेगाव मुळेगाव तांडा दोड्डी आहेरवाडी वडजी गंगेवाडी तांदूळवाडी वरळेगाव आधी गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले तर आभार अजित चौगुले यांनी केले.