अपर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांनी पदभार घेतला ; निवडणुकांचा दांडगा अनुभव ; कोण आहेत ठाकूर?
सोलापूर : तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूर अप्पर जिल्हाधिकारी पदावर झाल्यानंतर त्यांच्या जागेवर महानगरपालिका प्राधिकरणच्या सह आयुक्त मोनिका सुरजपालसिंह ठाकुर यांची नियुक्ती झाली. मंगळवारी ठाकूर यांनी सकाळी साडेदहा वाजता पदभार स्वीकारला.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन ओळख करून घेतली. उपविभागीय अधिकारी क्रमांक एक सदाशिव पडदुने यांनीही ठाकूर यांचे स्वागत केले.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रथम सोलापूरची माहिती घेते, येथील चॅलेंज, प्रश्न, समस्या जाणून घेते असे सांगताच येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर असेल. यापूर्वी पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर काम करताना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाचा चांगला अनुभव पाठीशी आहे, त्याचा निश्चितच सोलापूरमध्ये कामकाज करताना उपयोग होईल असे त्या म्हणाल्या.
कोण आहेत मोनिका ठाकूर?
मोनिका सुरजपालसिंह ठाकुर या मूळच्या बीड जिल्ह्यातील आहेत. यांचे शिक्षण औरंगाबाद मध्ये झाले. उपजिल्हाधिकारी 2002 बॅचच्या त्या असून पहिली पोस्टिंग उपजिल्हाधिकारी नागपूर येथे झाली. त्यानंतर पुणे, मुंबई, सातारा या ठिकाणी त्यांची सेवा झाली आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांचे प्रमोशन अप्पर जिल्हाधिकारी पदावर झाले. मोनिका ठाकूर यांना उर्दू शेरोशायरी मुशायऱ्यांची आवड असून त्या अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावतात ही माहिती मिळाली.