मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. विभागातील कुणबी नोंदी तपासणीच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
मराठवाडयातील जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने दाखले वितरीत करण्यात आल्याचे मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सायंकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी ऑनलाईन प्रणालीने मंत्रालयातून संवाद साधला. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर उपस्थित अधिकार्यांना मार्गदर्शन केले.
मराठवाडयातील जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबीचे दाखले वितरीत करण्यासाठी १२ प्रकारच्या पुराव्यांची तपासणी करण्यात आली. सोलापूर याप्रमाणे पुराव्यांची तपासणी करुन दाखले वितरीत करण्यासाठी तातडीने यंत्रणा कार्यान्वित करावी अशी सूचनाही यावेळी मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना केली. तहसील पातळीवरही तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली दाखले वितरीत करण्यासाठी यंत्रणा विकसीत करुन त्यादृष्टीने तातडीच्या उपाय योजनाही करण्यात यावे असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्यात कुणबी सदर्भात काही पुरावे आढळून आले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार आता प्रत्येक तहसील पातळीवर यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने कुणबी दाखल्यांचे वितरण मराठा समाजाला होण्यासाठी गती येण्याची शक्यता आहे.
निवासी उपजिल्हाधिकार्यांना नेमले समन्वय अधिकारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दिलेल्या सूचनेनुसार तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात वितरणासाठी कक्ष स्थापन करण्यात येत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची यासाठी समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.