अयोध्येत पोलिसांनी आईला सांगितले, “तुम टेन्शन मत लो, अम्मा आ गयी है” ; चंद्रिका चौहान यांनी केले अयोध्येतील अनुभव कथन
सोलापूर : अयोध्येच्या राम मंदिरात श्री रामाची मूर्ती प्रतिष्ठापना झाली. त्याठिकाणी येणाऱ्या भक्तांना अन्नदान करण्याच्या सोयीसाठी सोलापुरातून सकल हिंदू समाजाच्या वतीने भंडारचे आयोजन केले होते. उद्योगवर्धीनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
तब्बल 26 दिवसांच्या सेवेनंतर चौहान या सोलापूरला आल्या. त्या प्रीत्यर्थ केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने रविवारी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अयोध्येत भांडार चालविण्यास सहकार्य केलेले उद्योजक राम रेड्डी, सतीश मालू, पुरुषोत्तम उडता, रंगनाथ बंकापुरे या मान्यवरांचे औक्षण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गिरिधारी भुतडा, संजय कुलकर्णी, इंद्रमल जैन, कुशाल देढीया, अनिल जैन, धिरेन गडा, हिंदुराव गोरे, आरिफ शेख, आनंद चंदनशिवे, कल्पेश जव्हेरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राम रेड्डी, चंद्रिका चौहान व सतीश मालू यांनी अयोध्येतील अनुभव कथन केले. अयोध्येचा तो मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा हा अविस्मरणीय व डोळ्यांचे पारणे फेडणारा होता, अनेक गोष्टी चमत्कारिक रित्या घडत गेल्या, त्यामागे श्रीरामाचा आशीर्वाद नक्की होता. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण प्रत्येकांना जय श्रीराम म्हणत गेलो आणि सर्व सोयी होत गेल्या. आमच्या भांडारात जेवणार्या पोलिसांनी aतर आईला सांगितले, की “तुम टेन्शन मत लो, अम्मा आ गयी है” अशा अनुभव कथनाने उपस्थितांनी सुद्धा राम भक्ती अनुभवली.