राष्ट्रवादीचे मुजीब शेख लेबर फेडरेशनचे संचालक ; काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते सत्कार
सोलापूर : सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनची निवडणूक लागली आहे. दहा संचालक बिनविरोध झालेले आहेत आठ जागेसाठी ही निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुजीब शेख हे बिनविरोध संचालक झाले आहेत. मुजीब शेख यांना संचालक करण्यामागे काँग्रेसने ते सुरेश हसापुरे यांचा सिंहाचा वाटा आहे.
शनिवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी मुजीब शेख यांची लेबर फेडरेशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल आपल्या जनवात्सल्य या निवासस्थानी बोलवून त्यांचा सत्कार केला. त्यांना चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मुजीब शेख यांनी सुरेश हसापुरे यांनी दिलेला शब्द पाळला आणि त्यांच्यामुळेच मी आज लेबर फेडरेशनवर संचालक झालो आहे, त्यांच्या विश्वासाला सार्थ राहुन काम करेल असा शब्द दिला.