“बुके, हार नको, कामे सांगा” ; नव्या निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांचा नवा पायंडा
सोलापूर : तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या जागेवर पुणे महानगर विकास प्राधिकरण उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांची नियुक्ती झाली. त्यांनी शनिवारी दुपारी पदभार घेतला.
या नव्या आरडीसी मॅडम यांचे आता वेगळ्या पद्धतीने कौतुक होत आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नवा पायंडा पाडला असून त्यांच्या स्वागताला जो कोणी बुके किंवा हार आणला असेल त्या ते स्पष्टपणे नाकारत आहेत. बुके हार बाहेरच ठेवून नागरिकांना आत जावे लागत आहे. बुके हार नको, कामे सांगा अशा पद्धतीने त्यांचं कामकाज सुरू झाले आहे.
मनीषा कुंभार यांना यापूर्वी सोलापुरात कामकाज केल्याचा चांगला अनुभव आहे. कुंभार या २०१३ ते २०१६ दरम्यान कुडूवाडी प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या मूळच्या सातारा येथील असून पुण्यात त्यांचे शिक्षण झाले आहे.
अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूर अप्पर जिल्हाधिकारी पदावर झाली. त्यांचा पदभार महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. लवकरच सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी नवीन अधिकारी येईल त्या ठिकाणीही महिला अधिकारी येणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.