ब्रेकिंग : सोलापुरातील तब्बल 18 जणांना सक्तमजुरीची शिक्षा ; खुनाचा होता प्रयत्न
सोलापूर : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश आर एन पांढरे यांनी तब्बल 18 जणांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आठ वर्षे चाललेल्या या खटल्यात तीन आरोपी मयत झाले आहेत. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील एडवोकेट अल्पना कुलकर्णी, मूळ फिर्यादी कडून एडवोकेट एच एच बडेखान तर आरोपीच्या वतीने एडवोकेट धनंजय माने तर एडवोकेट पी एम ढालायत यांनी काम पाहिले.
सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे खालील प्रमाणे…
१. मेहबुब उर्फ दौला इस्माईल नालबंद
२. रियाज उर्फ गियासौद्दीन अहमदसाब रंगरेज
३. मतीन मुर्तज नालबंद
४. अल्ताफ रफियोद्दीन वंलमपल्ली
५. दाऊद अब्बास नालबंद
६. खलील खाजादाऊद नालबंद
७. अ.रज्जाक महीबूबसाब मंगलगिरी
८. म. गौस खाजादाऊद नालबंद
९. झुबेर मेहमूद नालबंद
१०. हरुन रफियोद्दीन वंलमपल्ली
११. म.कासीम म. शरिफ नालबंद
१२. मैनोद्दीन म. शरिफ नालबंद
१३. मेहमूद म.युसूफ नालबंद
१४. फारुक अ. रज्जाक मंगलगिरी
१५. हसन उर्फ सैफ अ. रज्जाक मंगलगिरी
१६. आरिफ जिलानी नालबंद
१७. इलियास अ. रज्जाक मुतवंली
१८ सर्फराज म. शरिफ नालबंद
यात हकिकत अशी की, इकरारअली मशिदच्या ट्रस्टीचा वाद आपसात मिटविण्याकरीता सोलापूर शहर काझी यांनी दि.०१.१२.२०१५ रोजी दुपारी २.०० वाजता इकरारअली मशिदमध्ये बैठक आयोजित केली होती. त्या मिंटीगसाठी फिर्यादी, साक्षीदार व आरोपी हजर होते. सदर मशिदचे आरोपी ट्रस्टी नसताना गेल्या २० वर्षापासून चंदा गोळा करतात, मशिदच्या जागेमध्ये बेकायदेशीर बांधकाम करतात, व त्या जागेमध्ये भाडेकरु ठेवून भाडे वसूल करतात, त्याचा त्यांनी अद्यापर्यंत हिशोब दिला नाही, अशी माहिती फिर्यादी यांनी सदर मिंटीगमध्ये दिली. त्यावेळी आरोपी यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना तुम्ही हिशोब विचारणारे कोण असे म्हणून मारहाण करणेस सुरुवात केली. आरोपीनी विटाचे तुकडे, दगड व सळई यांने फिर्यादी जैनोद्दिन शेख, सलाऊद्दिन शेख, इमरान हवालदार, अनवर जकलेर व फिर्यादीची आई मुमताज यांना मारहाण करुन आरोपी मेहबूब उर्फ दौला नालबंद यांनी फिर्यादीचा भाऊ सलाउद्दिन यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सळईने डोक्यात मारले. अशी फिर्याद फिर्यादी जैनोद्दिन शेख यांनी दिल्यावर जेलरोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. ए.पी.आय. डी. बी. राठोड यांनी गुन्हयाचा तपास करुन एकूण २१ आरोपीविरुध्द मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी चालू असताना यातील ०३ आरोपी मयत झाले.
सदर प्रकरणात सरकार पक्षाने १० साक्षीदार तपासले. साक्षीदारांनी दिलेला पुरावा, वेद्यकिय प्रमाणपत्रे व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरुन वरील १८ आरोपींना न्यायालयाने ०७ वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार दंडाची शिक्षा सुनावली. तसेच पाचही प्रत्येक जखमीना प्रत्येक आरोपींनी दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.